Saturday, 17 September 2011

fitter trade

जोडारी फिटर व्यवसाय
प्रवेश पात्रता – दहावी पास
कालावधी – २ वर्ष
प्रवेश क्षमता – प्रत्येक वर्षी २१
 ट्रेड चे स्वरूप :- जोडारी हा आय .टी .आय .मधील एक
महत्वाचा , लोकप्रिय  व खात्रीच्या रोजगार –स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देणाऱ्या व्यवसाय आहे . यामध्ये धातुवरील मुलभूत यांत्रिक क्रिया शिकवल्या जातात .उदा .धातू कापणे ,घासणे ,ड्रिलिंग ,ग्रायडिंग ,चीपीन्ग ,रीवेटीन्ग उष्ण्तोपचार, बेडिंग,ई .तसेच या ट्रेड मधील  प्रशिक्षर्थायाना टर्नर ,शीट मेटल्स वर्कर , वेल्डर .फोजिंग या व्यवसायाचे सुद्धा प्रशिक्षण दिले जाते . त्यामुळेच प्रशिक्षणार्थी मशिनचे सुटे भाग तयार करून फिटीग करणे, असेम्बली करणे ,मेंटेनन्स करणे ,फर्निचर तयार करणे , मोजमाप करणे असे विविध प्रकारची कामे करू शकतो. औदयोगिक क्षेत्रात फिटर ट्रेडच्या प्रशिक्ष्णार्थ्याना प्रचंड मागणी आहे.
     पुढील रोजगार –स्वयंरोजगार संधी :-
१)      टाटा महिंद्रा, किर्लोस्कर, गरवारे, सारख्या नामांकित कंपनीमध्ये नोकरीच्या संधी .
२)    एस.टी,रेल्वे,टांकसाळ,ओर्डनन्स, फकटोरी एअर् इंडिया  सारख्या ठिकाणी शासकीय संधी.
३)    स्वता:चे वर्क शॉप , वेल्डिंग शॉप , कारखाना सुरु करू शकतो.
साखर कारखाना ,सूत गिरणी ,सहकारी क्षेत्रात नोकरीच्या संधी.

No comments:

Post a Comment