Monday, 19 September 2011

ट्रेनिंग , करियर , प्लेसमेंट सेल (टी.सी.पी.सी.)


ट्रेनिंग , करियर , प्लेसमेंट सेल (टी.सी.पी.सी.)


ट्रेनिंग , करियर , प्लेसमेंट सेल (टी.सी.पी.सी.)
संस्थेत मुलांना बदलत्या औद्योगिक वातावरणाशी  सुसंगत ट्रेनिंग मिळावे तसेच उत्तीर्ण प्रशिक्षणार्थीना रोजगार व स्वयंरोजगार बाबत यथोचित मार्गदर्शन मिळावे यासाठी संस्थेत ट्रेनिंग , करियर , प्लेसमेंट सेल (टी.सी.पी.सी.) ची स्थापना करण्यात आली आहे. वाई येथील टी.सी.पी. सेल अतिशय कार्यक्षमरीत्या कार्यरत आहे. इंडस्ट्री मधील तज्ज्ञांचे मार्फत , विविध क्षेत्रातील जाणकारमार्फत , नामांकित व्यावासायिका द्वारे  टी.सी.पी.सी. ने संस्थेत व्यक्तीमत्व विकास , शिक्षणाचे तंत्र , अभियांत्रिकी चित्रकला , देशभक्ती सोफ्ट स्कील ई. विषयांवर सेमिनार यशस्वीपणे पार पडल्या आहेत. तसेच नामांकीत कारखान्यांमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग, इंडस्ट्रीयल व्हीझीट आयोजित करून मुलांमध्ये औद्योगिक संस्कार रुजविले आहेत. विविध नामांकीत व प्रसिद्ध कारखान्यांचे कॅम्पस  मुलाखती संस्थेत आयोजित करून  संस्थेतील प्रशिक्षणार्थ्या सोबतच परिसरातील युवकाना रोजगारांच्या संधी प्राप्त करून दिल्या  आहेत.ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धात्मक युगात टिकून राहण्या साठी आत्मविश्वास देणे हे ट्रेनिंग प्लेसमेंट सेल चे मुख्य उद्दिष्ट आहे.ट्रेनिंग , करियर , प्लेसमेंट ऑफिसर म्हणून श्री उपाध्ये सर काम पाहत आहेत.

No comments:

Post a Comment