Thursday, 15 September 2011

औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई


वाई भागातील युवकांना तांत्रिक व्यावसायिक कौशल्य प्राप्त व्हावे व ते स्वतःच्या पायावर उभे राहावेत यासाठी १९९६ साली औद्योगिक प्रशिक्षण संस्था , वाई ची स्थापना झाली .
                   प्रथम ४ ट्रेड ने सुरु झालेली लहान संस्था ,सध्या स्वतःच्या भव्य व प्रशस्त इमारतीमध्ये दिमाखामध्ये सुरु आहे .सध्या एकूण ९ ट्रेड व १७ युनिट सुरु असून  एकूण ३७२ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत .
                 केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या योजनेमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाईचा समावेश झालेला असून गरवारे बेस्टट्रेक लि.वाई उदयोग समूह हा संस्थेचा इंडस्ट्री पार्टनर आहे . औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाईचे प्राचार्य श्री .आर के.घाडगे व गरवारे  बेस्टट्रेक लि. उदयोग समूहाचे अध्यक्ष मा.श्री .के .जी .कर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वेगाने घौडदौड चालू आहे .
                 संस्थेत सुरु असलेले व्यवसाय खालीलप्रमाणे.
अ .क्र.
व्यवसाय
कालावधी
प्रवेश क्षमता
प्रवेश पात्रता

०१
जोडारी
२ वर्ष
२१
दहावी पास
०२
वीजतंत्री
२ वर्ष
२१
दहावी पास
०३
इलेक्ट्रोनिक्स मेक्यानिक
२ वर्ष
२१
दहावी पास
०४
टर्नर
२ वर्ष
२१
दहावी पास
०५
रबर टेक्नीशियन
२ वर्ष
२१
दहावी पास
०६
ड्रेस मेकिंग
 वर्ष
२१
दहावी पास
०७
कोपा
 वर्ष
५२
बारावी पास
०८
पेंटर (जनरल)
२ वर्ष
२१
आठवी पास
०९
शीट मेटल वर्कर
१ वर्ष
४२
आठवी पास

No comments:

Post a Comment