Monday 19 September 2011

COPA व्यवसाय



COPA व्यवसाय :- कालावधी १ वर्ष ,पात्रता १२ वी उत्तीर्ण , एकूण प्रवेश क्षमता ५२ ,एकूण तुकड्या ०२
स्वरूप : COMPUTER OPERATOR & PROGRAMMING ASST.असे या व्यवसायाचे पूर्ण नाव आहे. COMPUTER चे सर्व OPERATIONS M.S.OFFICE वापरता येणे ,SOFTWARE PROGRAMME तयार करून चालवून त्यामधील तृटी दूर करून ते अद्ययावत करणे तसेच इंटरनेट ,डी.टी.पी.त्या बरोबरच हार्डवेअर बऱ्यापैकी दुरुस्त करता येणे इ. सर्व समावेशक असे या व्यवसायाचे स्वरूप आहे. १ वर्ष पूर्ण वेळ रोज ८ तास संगणक विषयावरच प्रशिक्षण दिले जाते त्यामुळे या व्यवसायाचा प्रशिक्षणार्थी संगणक दृष्ट्या परिपूर्ण बनतो.


औ.प्र.संस्था.वाई येथे संगणकाची अतिशय सुसज्ज अशी लैब उपलब्ध आहे .पूर्ण A.C. लैब मधे अद्ययावत संगणक , इंटरनेट ,LAN CONNECTION ,SCANNER,PRINTER अद्ययावत SOFTWARE ,L.C.D. PROJECTOR अशा सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत ज्यामुळे लैब पाहताक्षणीच कोणालाही संगणक विषयक प्रशिक्षण घ्यावे तर इथेच असा विचार येईल.

No comments:

Post a Comment