Tuesday 11 October 2011

दिवाळी अंक


प्रती ,
मा.व्यवस्थापक,
------------------
विषय :-दिवाळी अंकात जाहिरात देणेबाबत
महोदय,
   औद्योगिक प्रशिक्षण संस्था,वाई मध्ये विविध उपक्रम धडाडीने व उत्साहाने राबविले जातात.त्यामुळेच पूर्ण महाराष्ट्रात  औद्योगिक प्रशिक्षण संस्था,वाई हि संस्था ROLE MODEL म्हणून नावाजली जाते .या वर्षी आय.टी.आय.वाई च्या संस्था व्यवस्थापन समिती तर्फे  दिवाळी अंकाचे प्रकाशन होणार आहे.यामध्ये औद्योगिक,तांत्रिक विषयक साहित्य प्रकाशित होणार आहे. वाई परिसरातील नामवंत उद्योजकांचे , यशस्वी माजी प्रशिक्षणार्थी, आय.टी.आय.वाई मधील कर्मचारी  व प्रशिक्षणार्थी यांचे तांत्रिक लेख  कविता,लेख,चित्रे,व्यंगचित्रे,विनोदी कथा,चुटकुले तांत्रिक शब्दकोडे,सुडोकू,इ  साहित्य,त्याबरोबरच आय.टी.आय वाई मध्ये राबविण्यात येणारे अभिनव उपक्रमांची माहिती प्रकाशित होणार आहे. असा दिवाळी अंक पूर्ण महाराष्ट्रात अभिनव ठरणार आहे.या अंकाच्या १५०० प्रती पूर्ण महाराष्ट्र भर वितरित केल्या जाणार आहेत.विविध कारखाने ,ग्रंथालये ,माजी प्रशिक्षणार्थी, आस्थापना ,शासकीय आय.टी.आय.खाजगी आय टी आय,यांनी अंकाची मागणी आधीच नोंदविली आहे.
  सदर दिवाळी अंकात आपल्या आस्थापनेची जाहिरात प्रकाशित झाल्यास औद्योगिक क्षेत्रात योग्य प्रसिद्धी मिळेल तसेच आय.टी.आय.वाई च्या दिवाळी अंकास हातभार लागेल तरी दिवाळी अंकात आपली जाहिरात प्रकाशित करावी हि विनंती.जाहिरात दराचा तपशील खालील प्रमाणे आहे.
अ.क्र.
आकार (SIZE)
कृष्ण धवल(BLACK&WHITE)
रंगीत (COLOUR)

1
FULL PAGE
2000
4000

2
HALF PAGE
1000
2000

3
QUARTER PAGE
500
1000

4
COVER INSIDE COLOUR
-----
5000

5
COVER BACKSIDE COLOUR
------
8000

सदर जाहिरात दराच्या रकमेचा ACCOUNT PAYEE चेक PRINCIPAL ,I.T.I.,WAI या नावाने द्यावा.व सदर रकमची रीतसर पावती घ्यावी.अधिक माहितीसाठी आय .टी.आय वाई येथे संपर्क साधावा.
सहकार्याच्या अपेक्षेत .                                   
                                                       प्राचार्य
                                               औद्योगिक प्रशिक्षण संस्था,वाई  

Wednesday 21 September 2011

गरवारे बाईकचे उदघाटन 





बायो मेट्रीक मशीन




पेंटर वर्कशॉप
 

फिटर वर्कशॉप


पेंटर वर्कशॉप





ITI WAI BUILDING





PAINTER TRAINEES PAINTING PICTURES

CLASSROOM FURNITURE


MAIN ENTRENCE


SWISS VOCATIONAL EDUCATION TRAINING PROGRAMME

Upaddhyesir conducting lesson

Upaddhye sir conducting lesson


Henspeter &Martin adressing to teachers






Monday 19 September 2011

COPA व्यवसाय



COPA व्यवसाय :- कालावधी १ वर्ष ,पात्रता १२ वी उत्तीर्ण , एकूण प्रवेश क्षमता ५२ ,एकूण तुकड्या ०२
स्वरूप : COMPUTER OPERATOR & PROGRAMMING ASST.असे या व्यवसायाचे पूर्ण नाव आहे. COMPUTER चे सर्व OPERATIONS M.S.OFFICE वापरता येणे ,SOFTWARE PROGRAMME तयार करून चालवून त्यामधील तृटी दूर करून ते अद्ययावत करणे तसेच इंटरनेट ,डी.टी.पी.त्या बरोबरच हार्डवेअर बऱ्यापैकी दुरुस्त करता येणे इ. सर्व समावेशक असे या व्यवसायाचे स्वरूप आहे. १ वर्ष पूर्ण वेळ रोज ८ तास संगणक विषयावरच प्रशिक्षण दिले जाते त्यामुळे या व्यवसायाचा प्रशिक्षणार्थी संगणक दृष्ट्या परिपूर्ण बनतो.


औ.प्र.संस्था.वाई येथे संगणकाची अतिशय सुसज्ज अशी लैब उपलब्ध आहे .पूर्ण A.C. लैब मधे अद्ययावत संगणक , इंटरनेट ,LAN CONNECTION ,SCANNER,PRINTER अद्ययावत SOFTWARE ,L.C.D. PROJECTOR अशा सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत ज्यामुळे लैब पाहताक्षणीच कोणालाही संगणक विषयक प्रशिक्षण घ्यावे तर इथेच असा विचार येईल.

ट्रेनिंग , करियर , प्लेसमेंट सेल (टी.सी.पी.सी.)


ट्रेनिंग , करियर , प्लेसमेंट सेल (टी.सी.पी.सी.)


ट्रेनिंग , करियर , प्लेसमेंट सेल (टी.सी.पी.सी.)
संस्थेत मुलांना बदलत्या औद्योगिक वातावरणाशी  सुसंगत ट्रेनिंग मिळावे तसेच उत्तीर्ण प्रशिक्षणार्थीना रोजगार व स्वयंरोजगार बाबत यथोचित मार्गदर्शन मिळावे यासाठी संस्थेत ट्रेनिंग , करियर , प्लेसमेंट सेल (टी.सी.पी.सी.) ची स्थापना करण्यात आली आहे. वाई येथील टी.सी.पी. सेल अतिशय कार्यक्षमरीत्या कार्यरत आहे. इंडस्ट्री मधील तज्ज्ञांचे मार्फत , विविध क्षेत्रातील जाणकारमार्फत , नामांकित व्यावासायिका द्वारे  टी.सी.पी.सी. ने संस्थेत व्यक्तीमत्व विकास , शिक्षणाचे तंत्र , अभियांत्रिकी चित्रकला , देशभक्ती सोफ्ट स्कील ई. विषयांवर सेमिनार यशस्वीपणे पार पडल्या आहेत. तसेच नामांकीत कारखान्यांमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग, इंडस्ट्रीयल व्हीझीट आयोजित करून मुलांमध्ये औद्योगिक संस्कार रुजविले आहेत. विविध नामांकीत व प्रसिद्ध कारखान्यांचे कॅम्पस  मुलाखती संस्थेत आयोजित करून  संस्थेतील प्रशिक्षणार्थ्या सोबतच परिसरातील युवकाना रोजगारांच्या संधी प्राप्त करून दिल्या  आहेत.ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धात्मक युगात टिकून राहण्या साठी आत्मविश्वास देणे हे ट्रेनिंग प्लेसमेंट सेल चे मुख्य उद्दिष्ट आहे.ट्रेनिंग , करियर , प्लेसमेंट ऑफिसर म्हणून श्री उपाध्ये सर काम पाहत आहेत.

Saturday 17 September 2011

fitter trade

जोडारी फिटर व्यवसाय
प्रवेश पात्रता – दहावी पास
कालावधी – २ वर्ष
प्रवेश क्षमता – प्रत्येक वर्षी २१
 ट्रेड चे स्वरूप :- जोडारी हा आय .टी .आय .मधील एक
महत्वाचा , लोकप्रिय  व खात्रीच्या रोजगार –स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देणाऱ्या व्यवसाय आहे . यामध्ये धातुवरील मुलभूत यांत्रिक क्रिया शिकवल्या जातात .उदा .धातू कापणे ,घासणे ,ड्रिलिंग ,ग्रायडिंग ,चीपीन्ग ,रीवेटीन्ग उष्ण्तोपचार, बेडिंग,ई .तसेच या ट्रेड मधील  प्रशिक्षर्थायाना टर्नर ,शीट मेटल्स वर्कर , वेल्डर .फोजिंग या व्यवसायाचे सुद्धा प्रशिक्षण दिले जाते . त्यामुळेच प्रशिक्षणार्थी मशिनचे सुटे भाग तयार करून फिटीग करणे, असेम्बली करणे ,मेंटेनन्स करणे ,फर्निचर तयार करणे , मोजमाप करणे असे विविध प्रकारची कामे करू शकतो. औदयोगिक क्षेत्रात फिटर ट्रेडच्या प्रशिक्ष्णार्थ्याना प्रचंड मागणी आहे.
     पुढील रोजगार –स्वयंरोजगार संधी :-
१)      टाटा महिंद्रा, किर्लोस्कर, गरवारे, सारख्या नामांकित कंपनीमध्ये नोकरीच्या संधी .
२)    एस.टी,रेल्वे,टांकसाळ,ओर्डनन्स, फकटोरी एअर् इंडिया  सारख्या ठिकाणी शासकीय संधी.
३)    स्वता:चे वर्क शॉप , वेल्डिंग शॉप , कारखाना सुरु करू शकतो.
साखर कारखाना ,सूत गिरणी ,सहकारी क्षेत्रात नोकरीच्या संधी.

Thursday 15 September 2011